बुलढाणा,
buldana-health-campaignराज्य शासनाच्या ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने शेगाव तालुयातील प्राथमिक आरोग्य केंद्र आडसुळ येथे दि. २ व ३ नोव्हेंबर, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव येथे दि. ४ व ५ नोव्हेंबर रोजी सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा नलावडे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिलाष खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिलाष खंडारे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रशिक्षणामध्ये सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा समुदायस्तरीय आरोग्य व्यवस्थापन, आरोग्यविषयक जनजागृती, प्रभावी व आदर्श गृहभेटीचे तंत्र तसेच आरोग्याच्या १३ सेवांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. समुदायाच्या आरोग्यविषयक गरजा ओळखून त्यानुसार आरोग्य सेवा पुरविणे, प्रतिबंधात्मक व प्रोत्साहनात्मक आरोग्यसेवा अधिक सक्षम करणे आणि नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला. कार्यशाळेत वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी (उकज), आरोग्य सेवक-सेविका, गटप्रवर्तक आणि आशा समन्वयक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निलेश जाधव, उझकउ प्रशिक्षक डॉ. शैलेश खंडारे, डॉ. जीवन भारती, डॉ. अंजली उजवणे, डॉ. सचिन भांगे, डॉ. मंगल राठोड, डॉ. मिलिंद वानखडे, श्रीमती कविता खाडे, श्रीमती स्वाती शेंद्रे आणि श्रीमती सोनाली चव्हाण यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. प्रशिक्षण प्रक्रियेत वैद्यकीय अधिकारी डॉ. बनकर व त्यांच्या पथकाने मोलाचे सहकार्य केले.