मोठी बातमी! CBSE 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर;

‘या’ दिवसापासून सुरू होणार पेपर्स

    दिनांक :06-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली
cbse exam केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आगामी शैक्षणिक वर्षासाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून, दोन्ही वर्गांच्या परीक्षा 16 फेब्रुवारी 2027 पासून एकाच दिवशी सुरू होणार आहेत. सर्व पेपर ठरल्याप्रमाणे सकाळी 10:30 वाजता सुरू झालेली परीक्षा पार पडणार आहे. यंदाच्या परीक्षेसाठी देशभरातून लाखो विद्यार्थी नोंदणीकृत झाले असून, यामध्ये इयत्ता 10 वीचे तब्बल 26.50 लाख आणि इयत्ता 12 वीचे 19.80 लाख विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
 

cbse

परीक्षेचे वेळापत्रक आणि विषय रचना:
इयत्ता 10 वीची परीक्षा:
10 वीच्या बोर्ड परीक्षा 16 फेब्रुवारी 2027 रोजी सुरू होऊन 9 मार्च 2027 पर्यंत चालणार आहेत. या कालावधीत विद्यार्थी एकूण 83 विविध विषयांच्या परीक्षा देतील.
इयत्ता 12 वीची परीक्षा:
12 वीच्या परीक्षा देखील 16 फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणार असून, या परीक्षांचा शेवट 9 एप्रिल 2027 रोजी होईल. यावर्षी 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी तब्बल 121 विषयांची परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
वेबसाइटवरून माहिती:
विद्यार्थी आपले सविस्तर विषयनिहाय वेळापत्रक सीबीएसईच्या cbse.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करू शकतात.

प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक:
मुख्य लेखी परीक्षांव्यतिरिक्त बोर्डाने प्रात्यक्षिक परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या तारखाही घोषित केल्या आहेत. नियमित शाळांमधील प्रात्यक्षिक परीक्षा 1 जानेवारी 2027 पासून सुरू होणार आहेत. मात्र, कडाक्याची थंडी किंवा बर्फवृष्टी होणाऱ्या विशिष्ट प्रदेशांमधील शाळांसाठी प्रात्यक्षिक परीक्षा आणि प्रकल्प मूल्यमापन 9 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर 2026 या कालावधीत पार पडले आहेत.