बुलढाणा,
dhanvantari-puja-buldhanaधनत्रयोदशीच्या पावन पर्वानिमित्त आरोग्य देवता भगवान धन्वंतरी यांचे पूजन करावे असे आवाहन केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या खासदार सुविधा कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे यांच्या उपस्थितीत भगवान धन्वंतरी यांचे विधिवत पूजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भालचंद्र चव्हाण,निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील, डॉ. राहुल मेहेत्रे, डॉ. दुर्गासिंग जाधव , नगरसेवक विजय जायभाये, गजू सुरडकर, आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांचे सहाय्यक खासगी स्वीय डॉ. गोपाल डिके, चंद्रकांत काटकर, युवराज वाघ, राजू भोर अभिजीत चव्हान यांच्यासह वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
भगवान धन्वंतरी यांना आयुर्वेद आणि आरोग्याचे अधिष्ठाता मानले जाते. धनत्रयोदशीच्या निमित्ताने त्यांच्या पूजनातून आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासोबतच निरोगी जीवनशैली, आरोग्य संवर्धन आणि भारतीय पारंपरिक वैद्यकीय ज्ञानाबद्दल जनजागृती करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.