वाशीम जिल्ह्यातील ८,२७८ शेतकर्‍यांच्या खात्यात ८४ कोटी जमा

शेतकरी कर्जमुक्ती योजना

    दिनांक :06-Nov-2026
Total Views |
वाशीम, 
farm loan waiver पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ अंतर्गत वाशीम जिल्ह्यातील पात्र ८ हजार २७८ शेतकर्‍यांच्या बँक खात्यांमध्ये चौथ्या टप्प्यात एकूण ८४ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. यामध्ये सेवा सहकारी संस्था (जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक) अंतर्गत १ हजार ७०५ शेतकर्‍यांना १२.२४ कोटी रुपये, तर राष्ट्रीयकृत, ग्रामीण व खासगी बँकांमधील ६ हजार ५७३ शेतकर्‍यांना ७१.७६ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे.
 

शेतकरी कर्जमुक्ती योजना 
 
 
राज्य शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही योजना जाहीर केली आहे. वाशीम जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्था तसेच राष्ट्रीयकृत, ग्रामीण व खासगी बँकांच्या एकूण ६९ हजार ९२४ पात्र लाभार्थी शेतकर्‍यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत ६० हजार ९७७ शेतकर्‍यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले असून ८ हजार ९४७ शेतकर्‍यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे. चौथ्या टप्प्यातील ८४ कोटी रुपयांच्या लाभासह पहिल्या, दुसर्‍या, तिसर्‍या व चौथ्या टप्प्यांत मिळून जिल्ह्यातील एकूण ५८ हजार ९१९ पात्र शेतकर्‍यांच्या खात्यांमध्ये आतापर्यंत ५३०.९८ कोटी रुपये जमा झाले आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांची अ‍ॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी असणे आवश्यक आहे. ज्या पात्र शेतकर्‍यांनी अद्याप फार्मर आयडी नोंदणी केलेली नाही, त्यांनी ती तातडीने पूर्ण करावी.farm loan waiver त्यानंतर आपला विशिष्ट क्रमांक (फार्मर आयडी) व आधार क्रमांक घेऊन नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. आधार प्रमाणीकरण आणि अ‍ॅग्रीस्टॅक फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करून पात्र शेतकर्‍यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर व जिल्हा उपनिबंधक माणिकराव लटपटे यांनी केले आहे.