आई घरकाम सांगते म्हणून मुलीने केले पलायन

- मध्यप्रदेशातून घेतला मुलीचा शोध

    दिनांक :06-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
girl runs away आई सतत काम सांगते आणि काम केले नाही की आरडाओरड करते, यामुळे १७ वर्षीय मुलगी कंटाळली. तिला आईने आरडाओरड केली, त्याचा राग मनात धरुन मुलीने थेट घरातून पलायन केले. चिंतेत पडलेल्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथका अहोरात्र मेहनत घेऊन त्या मुलीचा शोध घेतला. त्या मुलीला मध्यप्रदेशातील बालाघाट शहरातून ताब्यात घेतले. तिचे समूपदेशन केल्यानंतर पालकांच्या स्वाधीन केले.
 

girl runs away 
 
 
१७ वर्षीय अल्पवयीन पीडित मुलीने शाळा सोडली असून ती घरीच रहात होती. त्यामुळे तिची आई तिला घरकाम करण्यासाठी सांगत होती. मात्र, मुलगी घरकामाला मदत करत नव्हती. त्यामुळे तिची आई तिच्यावर रागावत असे. या कारणावरून १६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास कुणालाही न सांगता मुलगी घरातून निघून गेली. सायंकाळपर्यंत मुलगी घरी न आल्याने तिच्या आईने एमआयडीसी पोलिसात तक्रार केली होती. ठाणेदार बाबुराव राऊत यांनी लगेच अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. मुलीचा शोध घेण्यासाठी एमआयडीसी पोलिस आणि गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाचे शिपाई समांतर तपास करीत होते. गुन्हे शाखा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मुलगी ही बोंदुदा, ता. किरणापूर (जि. बालाघाट म. प्र.) येथे असल्याची माहिती मिळाली.girl runs away या माहितीच्या आधारे पोलिस पथक बोंदुदा येथे गेले असता मुलगी ही तिच्या मोठ्या आईच्या घरी मिळून आली. पोलिसांनी मुलगी आणि तिच्या मोठ्या आईला नागपुरात आणून पुढील कारवाईसाठी त्यांना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले.पोलिस निरीक्षक दर्शन पाटील व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.