चांगल्या तब्येतीसाठी हवी चांगली चयापचय क्रिया...

    दिनांक :06-Nov-2026
Total Views |
मुंबई,
how-to-improve-metabolic-healthसर्व ऋतूमानात प्रकृती चांगली ठेवणं म्हणजे शरीरातील चयापचय क्रिया म्हणजेच metabolic health चांगली असणं आवश्यक आहे. शरीर निरोगी राखण्यासाठी आणि आजारांचा धोका कमी करण्यासाठी, चयापचय क्रिया योग्यरित्या चालणं आवश्यक आहे. चयापचय प्रक्रियेतला महत्त्वाचा भाग म्हणजे, ज्याद्वारे शरीर अन्नाचं ऊर्जेत रूपांतर करतं. ही ऊर्जा शरीराची सर्व महत्त्वाची कार्यं पार पाडण्यासाठी मदत करते. चयापचय प्रक्रियेत अडथळा येतो, तेव्हा त्याचा परिणाम वजन, पचन, रक्तातील साखरेची पातळी आणि संप्रेरकांच्या संतुलनावर होऊ शकतो.

health
 
 
अयोग्य आहार, शारीरिक हालचालींचा अभाव, अपुरी झोप आणि सततचा ताण यांसारख्या सवयी चयापचय आरोग्यावर परिणाम करू शकतात. म्हणूनच, आरोग्य तज्ज्ञ नेहमी संतुलित जीवनशैलीचा सल्ला देतात. दैनंदिन सवयींमधे बदल करून चयापचय आरोग्य सुधारता येऊ शकतं. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीमुळे चयापचय आरोग्य म्हणजेच metabolic health सुधारण्यासाठी आणि ते टिकवून ठेवण्यासाठी मदत होऊ शकते. यासाठी तरुण वयापासूनच प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे.
निरोगी चयापचयासाठी, आहार सर्वात महत्त्वाचा असतो. आहारात प्रथिनयुक्त म्हणजेच protein-rich पदार्थांचा समावेश करणं फायदेशीर ठरू शकतं. प्रथिनांच्या पचनादरम्यान शरीर कर्बोदकं, मेद म्हणजेच फॅट्स पचवण्याच्या तुलनेत अधिक कॅलरीज खर्च करतं. या प्रक्रियेला 'थर्मिक इफेक्ट ऑफ फूड' असं म्हणतात.यासाठी आहारात अंडी, मासे, दूध, दही, डाळी, कडधान्यं आणि सुका मेवा आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, पालेभाज्या, अखंड धान्यं आणि हंगामी फळांमुळे शरीराला आवश्यक जीवनसत्त्वं, खनिजं आणि तंतूमय पदार्थ पुरवतात.