अनिल कांबळे
नागपूर,
sexual assault लग्नाचे आश्वासन देऊन २० वर्षीय तरुणीशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, लग्नाबाबत विचारणा केली असता नकार देत तिला मारहाण केली आणि खासगी व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली. हा प्रकार हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी राकेश डोंगरे (३२, रा. पारशिवनी, जि. नागपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी एकमेकांच्या परिचयातील आहेत. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी आरोपीने फिरायला जाण्याच्या बहाण्याने तरुणीला मानेवाडा परिसरातील त्याच्या खोलीवर नेले. तेथे तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर लग्न करण्याचे आश्वासन देत आरोपीने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, तरुणीने लग्नाबाबत वारंवार विचारणा केली असता आरोपीने लग्नास स्पष्ट नकार दिला. एवढेच नव्हे, तर तिला शिवीगाळ करून मारहाण केली.sexual assault तसेच तिचा खासगी व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित करून बदनाम करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकारानंतर पीडित तरुणीने हुडकेश्वर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी राकेश डोंगरे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास सुरू आहे.