मुंबई,
sharad-pawar-health-updateराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत रुग्णालयातून अपडेट समोर आली आहे. शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून खोकला आणि छातीतील संसर्ग कमी झाला असून त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतीत समदानी यांनी दिली आहे.
शरद पवार यांना नियमित तपासणी आणि वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राजकीय क्षेत्रातील विविध पक्षांचे वरिष्ठ नेते रुग्णालयात दाखल होत आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या प्रकृती ठीक असून खोकल्याचा त्रास कमी झाला आहे. वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.
शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ब्रीच कँडी रुग्णालयात गेले होते. त्यांच्यासोबत सचिन अहिर आणि मिलिंद देवरा हे नेतेही रुग्णालयात दाखल झाले होते. भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शरद पवारांना भेटून आलो त्यांच्याशी चर्चा झाली त्यांनी मला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांची तब्येत अतिशय चांगली असून उद्या डिस्चार्ज देखील होईल, चिंता करण्याचं कारण नाही.
मला शरद पवारांची त्यांची तब्येत मला उत्तम वाटली, ही राजकीय भेट नाही . महाराष्ट्रातला आणि देशांमध्ये देखील त्यांनी अनेक जबाबदारी पार पाडल्या आहेत. जेव्हा असा नेता हॉस्पिटल होतो तेव्हा त्यांना भेटण्यासाठी कुठलाही राजकीय हेतू नसतो. माझ्याकडे शरद पवारांचे राजकारण पलीकडचेही संबंध आहेत. राजकारणाबद्दल काहीही प्रश्न असतील तरी ते मला फोन करतात , अशा प्रकारचे आमचे कौटुंबिक संबंध आहेत