बुलढाणा
mehkar dr-kamalkishore-maniya मेहकरसारख्या छोट्या शहरातून आपल्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात करून जागतिक स्तरावर आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे डॉ. कमलकिशोर मनियार यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय यश संपादन केले आहे. डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेनॉलॉजी, पिंपरी, पुणे येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. मनियार यांची टोकियो, जपान येथे आयोजित होणार्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच अबूधाबी, संयुक्त अरब अमिराती या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या सदस्य म्हणूनही त्यांची निवड झाली आहे. या दोन्ही आंतरराष्ट्रीय नियुक्त्या त्यांच्या प्रदीर्घ संशोधन कार्याची, शैक्षणिक गुणवत्तेची आणि जागतिक स्तरावरील वैज्ञानिक योगदानाची महत्त्वपूर्ण दखल मानली जात आहे. संशोधन क्षेत्रातील आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. याशिवाय, निर्देशांकित आंतरराष्ट्रीय नियतकालिकाच्या संपादकीय मंडळावर सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांच्या नावावर तीन भारतीय पेटंट असून, संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना प्रतिष्ठेचा आणि विद्यान रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तसेच सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली आहे. आपल्या जिद्दीच्या, कठोर परिश्रमांच्या आणि सातत्यपूर्ण संशोधनाच्या जोरावर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.