ट्रम्पच्या पराभवामुळे सचिनने एका दिवसात कमावले 1,04,00,000 रुपये

विराट-रोहितचीही छप्पर फाड कमाई!

    दिनांक :06-Nov-2026
Total Views |
मुंबई,
virat-and-rohit अमेरिकेतल्या मिडटर्म निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. अमेरिकेमध्ये ट्रम्प यांचा पराभव झाल्यामुळे भारतीय शेयर बाजाराने उसळी मारली आणि भारतीय क्रिकेटर्सचे शेयरही रॉकेट बनले. सचिन तेंडुलकर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासह बऱ्याच भारतीय क्रिकेटपटूंनी गुंतवणूक केलेल्या शेयर्सनी नवा उच्चांक गाठला. गुरूवारी बीएसई 2 हजार आणि निफ्टी 500 पॉईंट्स वर गेला, याचा फायदा विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरला झाला. या दोघांचेही शेयर्स 23 टक्के वर गेले. या बंपर उसळीमधून सचिन तेंडुलकरने सर्वाधिक कमाई केली, तर विराट आणि रोहितचीही छप्पर फाड कमाई झाली. सचिन तेंडुलकरने आझाद इंजिनियरिंग शेयर वधारल्यामुळे 1.04 कोटी रुपये कमावले.
 
virat-and-rohit
 
गुरूवारी शेयर बाजारात ऐतिहासिक तेजी पाहायाला मिळाली. सेन्सेक्स 2 हजारांपेक्षा जास्त पॉईंट्ससह बंद झाला तर निफ्टीमध्येही 550 पेक्षा जास्त पॉईंट्सची वाढ झाली आणि निफ्टी 24,500 च्या आसपास बंद झाला. यात सचिन आणि विराट कोहलीच्या शेयरचे भाव 23 टक्क्यांनी वाढले.सचिन तेंडुलकरने आझाद इंजिनियरिंग या शेयरमध्ये 114 रुपये प्रती शेयरच्या हिशोबाने 5 कोटी रुपये गुंतवले आहेत. या शेयरने गुरूवारी रेकॉर्डब्रेक उसळी घेतली, त्यामुळे सचिनने एका दिवसात 1.04 कोटी रुपयांची कमाई केली. विराट कोहलीने गो डिजीट या शेयरमध्ये 75 रुपये प्रती शेयरच्या हिशोबाने 2 कोटी रुपये गुंतवले. विराटकडे या कंपनीचे 2,66,667 शेयर आहेत. या शेयरचा रेटही वाढल्यामुळे विराटने एका दिवसात 13.86 लाख रुपये कमावले. रोहित शर्माने स्वराज सुटिंग्सचे 236 रुपये प्रती शेयरच्या हिशोबाने 25.96 लाख गुंतवले त्यामुळे त्याच्याकडे या कंपनीचे 11 हजार शेयर आहेत. गुरूवारच्या तेजीमध्ये रोहित शर्माने या शेयरच्या माध्यमातून 25 ते 40 हजार रुपये कमावले.