उठा उठा दिवाळी आली, रोहित-विराटची बॅटींग पाहायची वेळ झाली

दुसरा वनडे कधी आणि किती वाजता?

    दिनांक :06-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
when-and-at-what-time-is-the-second-odi या दिवाळीसणासोबत क्रिकेटप्रेमींसाठी मोठी पर्वणी आहे. कारण या दिवाळीत क्रिकेट फॅन्सना भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिका पाहायची संधी मिळणार आहे. पहिला वनडे सामना हा बुधवारी 4 नोव्हेंबरला पार पडला. हा सामना टीम इंडियाने डिएलएस मेथडनूसार 5 विकेट राखून जिंकला होता. या सामन्यानंतर आता दुसरा वनडे सामना थेट दिवाळीतच आला आहे. शनिवारी 7 नोव्हेंबर 2026 ला हा सामना असणार आहे.
 
when-and-at-what-time-is-the-second-odi
 
हा सामना वेलिंग्टनच्या मैदानावर पार पडणार आहे.या सामन्याला सकाळी 7.30 वाजता सुरुवात होणार आहे. दिवाळीत सकाळी 7.30 वाजता सामना असल्या कारणाने तुम्हाला अभ्यंग स्नानानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीची बॅटींग पाहायची संधी मिळणार आहे.त्यामुळे क्रिकेटप्रेमींची दिवाळी आणखी गोड होणार आहे.त्यामुळेच उठा उठा दिवाळी आली रोहित-विराटची बॅटींग पाहायची वेळ झाली आहे,असे अनेक क्रिकेटप्रेमींच झालं आहे. दरम्यान टीम इंडियाने पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या वनडेत सामन्यात टीम इंडिया काय करते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.