अनिल कांबळे
नागपूर
rickshaw driver molests बसची प्रतीक्षा करणाऱ्या तरुणीला अश्लील इशारे करून आक्षेपार्ह वर्तन करणाऱ्या ऑटोचालकाविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तरुणीने विरोध करत आरडाओरड करताच तो ऑटो घेऊन पसार झाला. त्यामुळे ऑटो चालक आरोपीचे नाव स्पष्ट झाले नाही. त्याच्या ऑटोचा क्रमांक एमएच-३१-ईपी-००८२ आहे.
गुरुवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास सीताबर्डीतील झाशी राणी चौक बसथांब्यावर ही घटना घडली. पीडित तरुणी बसची प्रतीक्षा करत असताना एमएच-३१-ईपी-००८२ क्रमांकाचा ऑटो तेथे आला. चालकाने तिला कुठे जायचे आहे, अशी विचारणा केली. तरुणीने त्याकडे दुर्लक्ष करून कुठेही जायचे नसल्याचे सांगत बाजूला होण्यास सांगितले. मात्र, चालकाने तिचा पाठलाग सोडला नाही. तो ऑटोतून उतरून तिच्याजवळ गेला. तिला डोळा मारत अश्लील पद्धतीने घरी येण्याबाबत विचारणा केली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या तरुणीने आरडाओरड करून विरोध केला.rickshaw driver molests त्यामुळे भामट्या चालकाने ऑटोसह तेथून पळ काढला. तरुणीच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ऑटोच्या क्रमांकाच्या आधारे आरोपी चालकाचा शोध सुरू आहे.