इस्लामाबाद,
bashir-zeb-removed-bla-chiefजेव्हा जेव्हा पाकिस्तानच्या अत्याचारांना प्रत्युत्तर देण्याची चर्चा व्हायची, तेव्हा बलुचिस्तानमध्ये एकच नाव घुमायचे, ते म्हणजे ‘बशीर जेब’. या एका नावाने इस्लामाबादपासून रावळपिंडीपर्यंतच्या सत्ताधाऱ्यांची झोप उडवली होती. बलुच लिबरेशन आर्मी चा हा प्रमुख. हातात रायफल घेऊन बलुचिस्तानच्या डोंगररांगांमध्ये दुचाकीवरून फिरतानाचे त्याचे फोटो पाहून अनेकांना ‘धुरंधर’ चित्रपटातील ‘हमजा अली मजारी’ या पात्राची आठवण व्हायची. मात्र पाकिस्तानचे ‘फेल्ड मार्शल’ असीम मुनीर यांच्यासमोर आव्हान उभे करणाऱ्या या ‘धुरंधर’ला आता त्याच्याच लोकांकडून मोठा धक्का बसला आहे. बलुचिस्तान-पाकिस्तान संघर्षादरम्यान घडलेली ही घटना एखाद्या बुद्धिबळाच्या खेळासारखी वाटत आहे.
3 नोव्हेंबर रोजी BLA चा प्रवक्ता जियंद बलुच याने एक धक्कादायक घोषणा केली. बशीर जेब आता BLA चा प्रमुख राहणार नाही, असे त्याने स्पष्ट केले. ही बातमी समोर येताच बलुचिस्तानपासून पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांपर्यंत खळबळ उडाली. ज्या व्यक्तीने पाकिस्तान सरकारला सतत आव्हान दिले, त्याला अचानक पदावरून का हटवण्यात आले? त्याच्याच लोकांनी त्याचा विश्वासघात केला की BLA मध्ये मोठी बंडखोरी झाली आहे?
बशीर जेब हा काही सामान्य व्यक्ती नाही. त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली असून तो साहित्याचा विद्यार्थीही राहिला आहे. बलुच विद्यार्थी राजकारणातून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. डिसेंबर 2018 मध्ये अफगाणिस्तानात झालेल्या आत्मघाती हल्ल्यात अस्लम बलुच मारला गेल्यानंतर बशीर जेबने BLA ची सूत्रे हाती घेतली.