भारतात दिवाळी, पाकिस्तानाचं मात्र दिवाळं! चार महिन्यांत पाकला मोठा फटका

    दिनांक :07-Nov-2026
Total Views |
इस्लामाबाद
pakistan-diwali सध्या देशभरात दिवाळीचा मोठा उत्साह पाहयला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात खरेदी होताना दिसत आहे. व्यवसायिकांसाठी हे दिलासादायक आहे. दरम्यान, एका बाजूला भारतात दिवाळी सुरु असताना पाकिस्तानचे मात्र, दिवाळं निघाल्याची परिस्थिती आहे. एका अहवालानुसार, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत पाकिस्तानची व्यापार तूट 16 टक्क्यांनी वाढून जवळपास 15 अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचली आहे.
 
pak pm
पाकिस्तानची निर्यात लक्षणीयरीत्या मंदावली, तर आयात 26 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत वाढली. जुलै ते ऑक्टोबर दरम्यान आयात आणि निर्यातीमधील तूट 14.6 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत वाढली आहे. ही तूट गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 2 अब्ज अमेरिकी डॉलरने, म्हणजेच 16 टक्क्यांनी, जास्त आहे.
आयात किती वाढली?
अधिकृत आकडेवारीनुसार, पहिल्या चार महिन्यांत आयात 26 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत वाढली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.9 अब्ज अमेरिकी डॉलरने, म्हणजेच 12.5 टक्क्यांनी अधिक आहे. मध्यवर्ती बँकेने असा अंदाज वर्तवला आहे की, वाढत्या ऊर्जा आयात बिलांमुळे या आर्थिक वर्षात एकूण आयात 71 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचू शकते. PBS ने अहवाल दिला की जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत एकूण निर्यात वाढून 11.4 अब्ज अमेरिकी डॉलर झाली, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत केवळ 890 दशलक्ष अमेरिकी डॉलर किंवा 8.5 टक्क्यांनी जास्त आहे.
88 अब्ज पाकिस्तानी रुपयांच्या अनुदानाची तरतूद
अहवालात म्हटले आहे की, परदेशी कर्जदात्यांवरील अवलंबित्व कमी होईल अशा पातळीपर्यंत निर्यात वाढवण्यासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात, सरकारने प्रामुख्याने मोठ्या निर्यातदारांना स्वस्त कर्ज देण्यासाठी 88 अब्ज पाकिस्तानी रुपयांच्या अनुदानाची तरतूद केली आहे. मासिक निर्यात साधारणपणे 2.5 अब्ज ते 3 अब्ज डॉलरच्या दरम्यान असते आणि डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया 100 ने घसरूनही निर्यातीत कोणतीही लक्षणीय वाढ झालेली नाही.

सरकारच्या अंदाजानुसार, या आर्थिक वर्षात वस्तूंची निर्यात 34 अब्ज डॉलर होईल
मध्यवर्ती बँकेनुसार, शुक्रवारी पाकिस्तानी रुपया एका पैशाने मजबूत होऊन प्रति डॉलर 276.66 पाकिस्तानी रुपयांवर पोहोचला. सरकारच्या अंदाजानुसार, या आर्थिक वर्षात वस्तूंची निर्यात 34 अब्ज डॉलर होईल, जी गेल्या वर्षी 30.8 अब्ज डॉलर होती. जर हीच गती कायम राहिली, तर पाकिस्तान 2029 साठी निश्चित केलेले 60 अब्ज डॉलर्सचे निर्यातीचे लक्ष्य गाठू शकणार नाही.
आयातीमध्ये मोठी वाढ झालीय
आयातीमधील मोठी वाढ (दरमहा सरासरी 6.5 अब्ज डॉलर्स) आणि निर्यातीमधील घट (दरमहा सरासरी 2.8 अब्ज डॉलर्स). नियोजन मंत्री अहसान इक्बाल यांनी यापूर्वी म्हटले होते की, भविष्यातील आयएमएफच्या कोणत्याही कार्यक्रमांना टाळण्यासाठी निर्यात 60 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवणे ही एक पूर्वअट आहे.