अनिल कांबळे
नागपूर,
mayo hospital बुलेटच्या चेनमध्ये बोट चेपल्यामुळे मुलाला घेऊन उपचारासाठी मेयोत आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने उपचारासाठी घाई केली. त्यामुळे चिडलेल्या सात ते आठ डॉक्टरांनी पोलिस कर्मचाऱ्याची धुलाई केली. त्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यानेही मुलाच्या मदतीने डॉक्टरांवर हल्ला केला. या प्रकरणी पोलिस कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरुन डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजीत जाधव हे नागपूर पोलिस दलातील मुख्यालयात कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा वेदांत जाधव हा ४ नोव्हेंबरला घरी बुलेटची साफसफाई करीत होता. मात्र, दरम्यान, त्याचे एक बोट चेनमध्ये अडकल्यामुळे रक्तस्त्राव सुरु झाला. वडिल रणजीत जाधव यांनी लगेच मुलाला मेयोत उपाचारासाठी आणले. आरोपी डॉक्टर विजय चांदेकर हा रुग्णावर उपचार करण्यास टाळाटाळ करीत होता. रक्तस्त्राव सुरु असल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्याने डॉ. विजय याला उपचार करण्यासाठी घाई केली. मात्र, डॉ. विजय आपल्याच पद्धतीने संथ गतीने काम करीत असल्यामुळे रुग्णाचे कागदपत्र परत मागतिले. त्यामुळे चिडलेल्या डॉ. विजय आणि मेयोतील अन्य ७ ते ८ डॉक्टरांनी पोलिस कर्माचारी रणजीत जाधव यांच्यावर हल्ला केला. त्यांचा मुलगा वेदांत वडिलांना वाचविण्यासाठी धावला असता त्यालाही डॉक्टरांनी मारहाण केली.mayo hospital या प्रकरणी पोलिस कर्मचारी जाधव यांच्या तक्रारीवरुन ७ ते ८ डॉक्टरांवर गुन्हे दाखल केले.
डॉक्टर-पोलिसावर गुन्हे दाखल
डॉ.विजय चांदेकर आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी एकमेकांना मारहाण केल्याची माहिती तहसील पोलिसांनी दिली. त्यामुळे दोन्ही पक्षाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुरावे गोळा करण्याचे काम सुरु असल्याची माहिती ठाणेदार संजय मेंढे यांनी दिली.