वर्धा,
Firm on returning the meager salary सेवाग्राम येथील बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षकेतर व सेवानिवृत्त कर्मचार्यांचे तब्बल ६८ महिन्यांचे वेतन थकीत आहे. मात्र, दिवाळीच्या दिवशी प्रत्येक कर्मचार्याच्या खात्यात ७ हजार रुपये टाकून कर्मचार्यांची एकप्रकारे थट्टाच केली. दरम्यान, जमा करण्यात आलेली प्रत्येकी ७ हजार रुपयांची रकम परत करण्यासाठी ८५ कर्मचारी यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर देशमुख यांच्या बंगल्यावर धडकले. या कर्मचार्यांची एकूण रकम ५ लाख ९५ हजार रुपये आहे. मात्र, अध्यक्ष समीर देशमुख बाहेरगावी गेल्याचे कर्मचार्यांना समजले. प्राचार्यांनीही ही रकम स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे सर्व कर्मचार्यांनी ही रकम तशीच ठेवून ती महाविद्यालयाच्या कार्यालयात नेऊन जमा करण्याचे निश्चित करण्यात आले.

कर्मचार्यांना तुटपुंजी दिवाळी भेट नको, तर त्यांच्या हकाचे संपूर्ण थकीत वेतन हवे आहे. ६८ महिन्यांचे वेतन थकीत असताना केवळ ७ हजार रुपये देणे ही कर्मचार्यांच्या प्रदीर्घ सेवेची अवहेलना असल्याची भावना यावेळी कर्मचार्यांनी व्यत केली. या परिस्थितीमुळे कर्मचार्यांनी यंदाची दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला असून, काळी दिवाळी पाळण्याचे जाहीर केले आहे. थकीत वेतनामुळे कर्मचारी आर्थिक अडचणीत असून, त्यांच्या मनावरही मोठा ताण आहे. या गंभीर परिस्थितीत कोणत्याही कर्मचार्याच्या जीवितास काही बरेवाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संस्थेचे प्रशासन आणि संबंधित व्यवस्थापनाची राहील, असा इशाराही कर्मचार्यांनी दिला.