सलग पाच दिवस सुट्ट्यांची पर्वणी

    दिनांक :07-Nov-2026
Total Views |
मुंबई
government employees
दिवाळीच्या सणानिमित्त राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांना सलग पाच दिवस सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे. आजपासून ते ११ नोव्हेंबरपर्यंत सुट्ट्यांची सलग संधी उपलब्ध झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांना दिवाळीचा सण कुटुंबीयांसोबत निवांतपणे साजरा करता येणार आहे.


दरम्यान, दिवाळीच्या सुट्ट्यांनंतरही सरकारी कार्यालयांमधील कामकाज पूर्वपदावर येण्यास काहीसा विलंब होण्याची शक्यता आहे. अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी १२ आणि १३ नोव्हेंबर रोजीही वैयक्तिक रजा घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दिवाळीचा सुट्ट्यांचा कालावधी संपल्यानंतरही विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीचा परिणाम कार्यालयीन कामकाजावर होऊ शकतो. परिणामी, विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमधील दैनंदिन कामे तसेच नागरिकांशी संबंधित प्रशासकीय कामे काही दिवस संथ गतीने चालण्याची किंवा ठप्प राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दिवाळीनंतर सरकारी कार्यालयांतील कामकाज सुरळीत होण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते.