‘हनुमान अंश’ची ओटीटीवर एंट्री!

    दिनांक :07-Nov-2026
Total Views |

मुंबई,
hanuman-ansh-ott-release7ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला 'हनुमान अंश' हा चित्रपट 2026 मधील सर्वात मोठ्या आश्चर्यांपैकी एक आहे. बॉक्स ऑफिसवर हिट होण्यासाठी चित्रपटाला नेहमीच मोठ्या बजेटची गरज नसते. 'हनुमान अंश' हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. विशाल चतुर्वेदी दिग्दर्शित 'हनुमान अंश' हा चित्रपट लक्ष्मी नारायण शर्मा नावाच्या एका तरुणाची कथा सांगतो, ज्याचं आयुष्य एका वैयक्तिक दुःखद घटनेमुळे पूर्णपणे बदलून जातं.
 

hanuman ansh 
जीवनातील प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी लक्ष्मी नारायण शर्मा हळूहळू अध्यात्माकडे कसा वळतो, याचा प्रवास दाखवतो. लक्ष्मी नारायण शर्मा पुढे जाऊन भारतातील सर्वात प्रमुख आध्यात्मिक व्यक्तींपैकी एक असलेले नीम करोली बाबा कसे बनतात, हे या चित्रपटात दाखवलं आहे.
 
2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या 'हनुमान अंश'ने जगभरात 450 कोटींहून अधिक कमाई केली आहे. सुरुवातीच्या काही आठवड्यांत चित्रपटाची कमाई खूपच कमी होती हे लक्षात घेता, ही कमाई चमत्कारापेक्षा कमी नाही.या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटगृहांमधील यशस्वी कामगिरीनंतर हा चित्रपट डिजिटल प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. आता हा चित्रपट आता ओटीटीवर पाहता येणार आहे.
 
ज्यांनी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पाहिला नाही, ते आता घरबसल्या आरामात ऑनलाइन पाहू शकतात. 27 नोव्हेंबर 2026 पासून सोनीलिव्हवर उपलब्ध होईल.