मुंबई,
maharashtra-weather-el-nino-alertराज्यातील हवामानात बदल होत आहे. मध्यंतरी अनेक भागात पाऊस झाला. राज्यात यंदा कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात आला. नुकताच झालेल्या पावसाने मोठा दिलासा मिळाला. मात्र, आता पुन्हा राज्यात उष्णता वाढताना दिसत आहे. नोव्हेंबर महिन्याला सुरूवात झाल्यानंतर आता थंडीची चाहूल लागत आहे. त्यातच मोठा इशारा देण्यात आला. स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांच्या माहितीनुसार, प्रशांत महासागरात अल निनो अधिक तीव्र झाला आहे. ज्यामुळे पश्चिम बंगालच्या खाडीत समुद्रातील तापमानात अपेक्षेपेक्षा जास्त वाढ झाली. नॉर्थ इस्ट मॉन्सून अॅक्टिव्ह झाला. आज जवळपास ठिकाणी कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहणार असून दुष्काळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
आज कोकणात हलक्या ते मध्यम स्वरूपाची पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरात 37 अंशापर्यंत तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 7 नोव्हेंबर रोजी जवळपास जिल्ह्यात हवामान कोरडे राहिल. राज्यात पुढील काही दिवसात उष्णता अधिक वाढण्याचे दाट संकेत आहेत.
त्यातच उष्णतेसोबतच मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर फटाके फोडण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत, तरी देखील दिवाळीत मात्र या निर्बंधांना नागरिकांकडून हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे. गेली काही वर्षे मुंबईतील हवा गुणवत्तेत्चा विषय चिंतेचा बनला आहे. मुंबईच्या हवेचा गुणवत्ता स्थर खालवला असून प्रदूषणात वाढ झाली आहे. मुंबईच्या कालच्या AQI 107 तर आजचा AQI 102 नोंदवला आहे.
यामध्ये बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील सर्वात प्रदूषित हवा आहे. त्यातच राज्यातील इतर भागात उष्णता वाढली आहे. मुंबईतील हवा दिवसेंदिवस घातक बनत चालली आहे. सकाळी सर्वत्र धुके बघायला मिळाले. त्यातच आता भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्याकरिता पुढील काही दिवस अत्यंत धोकादायक आहेत. पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. मराठवाड्यासह अनेक भागात स्थिती अधिक भीषण आहे. मध्यंतरी झालेल्या पावसाने थोड्याप्रमाणा दिलासा मिळाला.