मोहम्मद शमीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; चाहत्यांना धक्का!

    दिनांक :07-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
mohammed-shami-retires भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. दुखापतीमुळे गेल्या काही काळापासून संघाबाहेर असलेल्या शमीने अखेर कसोटी कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्याने ही माहिती चाहत्यांना दिली.

mohammed-shami-retires
६ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री उशिरा शमीने निवृत्तीची घोषणा केली. विशेष म्हणजे, ही तारीख त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील महत्त्वाच्या दिवसांपैकी एक आहे. ६ नोव्हेंबर २०१३ रोजी त्याने कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. पदार्पणाच्या दिवशीच निवृत्ती जाहीर करून त्याने आपल्या कसोटी प्रवासाच्या आठवणींना एक वेगळे वळण दिले.
शमीने भारतीय संघासाठी आतापर्यंत ६४ कसोटी सामने खेळले असून, त्याच्या नावावर २२९ बळींची नोंद आहे. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो १२व्या स्थानावर आहे. तर भारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये त्याचे स्थान सहावे आहे. गेल्या काही दिवसांपासून दुखापतीमुळे शमी भारतीय संघाचा भाग नव्हता. त्यामुळे त्याच्या पुनरागमनाबाबतही प्रश्न उपस्थित केले जात होते. अशातच त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. भारतीय क्रिकेटमधील त्याच्या १३ वर्षांच्या कसोटी प्रवासाची अखेर या निर्णयाने झाली आहे.