पचमढी,
nagpur-teacher-dies-pachmarhiमध्य प्रदेशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पचमढी येथे पर्यटनासाठी गेलेल्या नागपूरच्या एका शिक्षकाचा खोल दरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडलीय. विजय नाईक असे 40 वर्षीय मृत शिक्षकाचे नाव असून ते नागपुरातील रामदासपेठ येथील सोमलवार शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. पचमढीच्या प्रियदर्शनी पॉइंटवर फिरत असताना माकडाने त्यांची बॅग हिसकावली. ती परत मिळवण्याच्या प्रयत्नात त्यांचा तोल गेला आणि ते खोल दरीत कोसळले. त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय नाईक हे पर्यटकांच्या एका गटासह गुरुवारी सायंकाळी नागपूरहून पचमढी येथे पोहोचले होते. शुक्रवारी सकाळी हा गट प्रियदर्शनी पॉइंट येथे फिरण्यासाठी गेला होता. तेथे निसर्गसौंदर्याचा आनंद घेत असताना फोटो काढण्याच्या वेळी एका माकडाने विजय यांची बॅग हिसकावली. बॅग परत मिळवण्यासाठी त्यांनी माकडाच्या दिशेने धावून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचवेळी त्यांचा पाय घसरला आणि संतुलन बिघडल्याने ते थेट खोल दरीत कोसळले. घटनेची माहिती मिळताच पचमढी पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने अथक प्रयत्नांनंतर दरीतून त्यांचा मृतदेह बाहेर काढला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नागपूरला रवाना करण्यात आहे. मात्र या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून नाईक कुटुंबियांवर दुःखाचा डोगर कोसळाला आहे.
महामार्गावरील रस्त्याचे सिमेंटिकरणाचे काम सुरू असताना ठिकठिकाणी कामाचे अस्ताव्यस्त पडलेले साहित्य आणि अंधारात विद्युतची व्यवस्था नसल्यानं दुचाकी अनियंत्रित होऊन भीषण अपघात घडला. यात दुचाकीचालक गृहरक्षक दलाच्या सैनिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रामटेक - गोंदिया महामार्गावरील माडगी इथं मध्यरात्रीला घडली. गजानन तिजारे असं मृत पावलेल्या गृहरक्षक दलाच्या सैनिकांचं नावं आहे. अपघातस्थळी कोणतेही दिशादर्शक फलक किंवा रेडियम रिप्लेक्टर कंत्राटदारानं लावलेले नाही, सोबतचं मातीचे ढिगारे असल्यानं दुचाकीचा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तुमसर पोलिस घटनेचा पुढील तपास करीत आहे.