IAS-IPS दाम्पत्याची ४० व्हिलांची खरेदी चर्चेत!

    दिनांक :07-Nov-2026
Total Views |
rajasthan-officers-resort-dealराजस्थानमधील वरिष्ठ आयएएस अधिकारी शिखर अग्रवाल आणि त्यांच्या पत्नी आयपीएस अधिकारी डॉ. प्रशाखा माथूर यांच्यावर उदयपूर आणि अलवर येथील अनंता रिसॉर्टमध्ये 40 व्हिला आणि कॉटेज खरेदी केल्याचा आरोप आहे.
 

A major decision by schools in Delhi 
त्यांनी या मालमत्ता रिसॉर्ट चालवणाऱ्या गोयल फॅशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून खरेदी केल्याचा आरोप आहे. तसेच, सरकारी पदांवर असताना त्यांनी नियमांचे उल्लंघन करून या कंपनीला फायदा मिळवून दिल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे.
 
हे प्रकरण प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर देशभरात त्याची चर्चा सुरू झाली आहे.
राजस्थान सरकारने या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवली आहे. तसेच, शिखर अग्रवाल आणि त्यांच्या पत्नी डॉ. प्रशाखा माथूर यांना पदांवरून हटवून नवीन नियुक्ती मिळेपर्यंत प्रतीक्षेत ठेवलं आहे.
 
राज्य सरकारने 2 नोव्हेंबर रोजी आदेश काढून गोयल फॅशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिल्या जाणाऱ्या सरकारी सवलतीही बंद केल्या आहेत.
 
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भजनलाल शर्मा सरकारच्या काळात समोर आलेलं हे भ्रष्टाचाराचं सर्वात मोठं प्रकरण असल्याचं म्हटलं आहे. तसेच, या प्रकरणाची सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.