मुंबई
salman khan सलमान खान यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘तेरी सेक्सी ब्यूटी’ या गाण्याला आपला आवाज दिला आहे. या गाण्यात सलमान खान यांच्यासोबत अभिनेत्री चित्रांगदा सिंह झळकत आहे. सलमान यांचा दमदार आवाज आणि चित्रांगदा यांचा ग्लॅमरस अंदाज यांचा सुरेख मेळ या गाण्यात पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, या नव्या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
‘तेरी सेक्सी ब्यूटी’ या गाण्याच्या माध्यमातून सलमान खान आणि चित्रांगदा सिंह पहिल्यांदाच एका नव्या जोडीच्या रूपात एकत्र दिसत आहेत. दोघांमधील फ्रेश केमिस्ट्री हे गाण्याचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. गाण्यात चित्रांगदा अत्यंत आकर्षक अंदाजात दिसत असून, सलमान यांचा सहजसुंदर वावर आणि प्रभावी स्क्रीन प्रेझेन्स यामुळे या जोडीला पडद्यावर पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. दोघांमधील खास बॉन्डिंगमुळे हे गाणे चाहत्यांसाठी अधिक मनोरंजक ठरत आहे.
या गाण्याला साजिद खान यांनी संगीत दिले असून, गीतलेखनाची जबाबदारीही त्यांनीच सांभाळली आहे. तर सीझर गोंझाल्विस यांनी गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. सलमान खान यांचा आवाज, संगीताचे आकर्षक ठेके आणि कलाकारांचे सादरीकरण यामुळे हे गाणे चित्रपटात ग्लॅमरसोबतच मनोरंजनाचीही मेजवानी ठरणार आहे.
अपूर्व लाखिया यांच्या दिग्दर्शनाखाली ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. सैनिकांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट फर्स्ट लूक आणि टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत आहे. त्यातच आता ‘तेरी सेक्सी ब्यूटी’ हे गाणे सर्व प्रमुख म्युझिक प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहे. या गाण्याच्या निमित्ताने प्रेक्षकांना सलमान खान यांचा संगीतविश्वातील नवा अंदाज अनुभवायला मिळत असून, चित्रांगदा सिंहसोबतची त्यांची नवी जोडीही चर्चेचा विषय ठरत आहे.