दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

    दिनांक :07-Nov-2026
Total Views |
पुणे, 
Schedule for Class 10 and 12 board exams महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. वेळापत्रक लवकर जाहीर झाल्यामुळे आता राज्यभरातील शिक्षकांना अध्यापनाचे अचूक नियोजन करणे आणि लाखो विद्यार्थ्यांना अभ्यासाची सखोल तयारी करणे अधिक सोपे होणार आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षांचे आयोजन केले जाणार आहे.
 
 
 
Schedule for Class 10 and 12 board exams
एचएससी बोर्ड परीक्षा आठ फेब्रुवारीपासून
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी (इयत्ता १२ वी) मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा बुधवार, २० जानेवारी ते शनिवार सहा फेब्रुवारी २०२७ या कालावधीत पार पडतील. तर लेखी परीक्षा सोमवार, आठ फेब्रुवारी ते गुरुवार, १८ मार्च २०२७ दरम्यान घेतल्या जातील.
एसएससीच्या बोर्ड परीक्षेला १५ मार्चपासून प्रारंभ
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेसाठी (इयत्ता १० वी) मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा गुरुवार, २८ जानेवारी ते शनिवार, १३ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत पूर्ण केल्या जातील. तर लेखी परीक्षा सोमवार, १५ फेब्रुवारी ते सोमवार, १५ मार्च २०२७ या दरम्यान मुख्य लेखी परीक्षा आयोजित केल्या जातील.