RCB च्या कॅप्टनची मॅचमधून माघार?

रिंकू सिंह बनला उपकर्णधार; चर्चांना उधाण

    दिनांक :09-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
RCB captain withdraws from the match आयपीएल 2025 चा विजेता संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदार याने मॅचमधून माघार घेण्याची बातमी समोर आली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली तब्बल 18 वर्षांनंतर RCB ला ट्रॉफी मिळाली होती. त्यामुळे रजत पाटीदारच्या या निर्णयामागे नेमके कारण काय, ते जाणून घेऊयात.एसीसी रायझिंग स्टार्स एशिया कप स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या पुरुष निवड समितीने इंडिया ए संघात एक महत्त्वाचा बदल केला आहे. आरसीबीचा स्टार बॅटर रजत पाटीदार दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर झाला आहे.रजत पाटीदार याने 50 ओव्हरच्या फॉरमॅटमध्ये निवडीसाठी विचार न करण्याची विनंती बीसीसीआयला केली होती. त्यानंतर त्याला भारत ‘अ’ संघातून मागे घेण्यात आले आहे, असे बीसीसीआयने जाहीर केले आहे.
 
 
RCB captain withdraws from the match
 
 
निवड समितीने पाटीदारच्या जागी अष्टपैलू खेळाडू आयुष बदोनी याचा संघात समावेश केला आहे, तर रिंकू सिंगकडे संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कर्णधार तिलक वर्माकडेच संघाचे नेतृत्व कायम असेल.आशिया कपमध्ये अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी देखील खेळणार असल्याने उत्साह अधिकच वाढला आहे. तसेच हर्षित राणा याला देखील टीम इंडियात संधी देण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या फिटनेसवर चर्चा होताना दिसत आहे. तसेच आयुष बदोनीकडे मोठी संधी असेल.
 
आशिया कपसाठी टीम इंडिया
अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, प्रभसिमरन सिंग (WK), तिलक वर्मा (C), रिंकू सिंग (VC), कुमार कुशाग्रा (WK), सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, विप्रज निगम, हर्ष दुबे, तनुश कोटियान, हर्षित राणा, प्रिन्स यादव, अर्शद खान, आयुष बदोनी.एसीसी मेन्स रायझिंग स्टार्स एशिया कप 2026 ही स्पर्धा 19 ते 29 नोव्हेंबर 2026 दरम्यान कतारमधील दोहा येथे 50 षटकांच्या (ODI) फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. ‘एसीसी इमर्जिंग टीम्स एशिया कप’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेत आशियातील युवा आणि उदयोन्मुख खेळाडूंना संधी दिली जाते. यामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचे ‘ए’ संघ, तर नेपाळ, युएई आणि हाँगकाँगचे मुख्य सीनियर संघ एकमेकांविरुद्ध लढतील. या स्पर्धेत एकूण 8 संघांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली असून, साखळी सामन्यांनंतर दोन्ही गटांमधील टॉप-2 संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील आणि 29 नोव्हेंबरला या स्पर्धेचा अंतिम सामना रंगेल.