नागपूर,
Datta Meghe Ayurveda College दत्ता मेघे आयुर्वेद महाविद्यालय येथे प्राचार्या डॉ. हर्षला राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदिक औषधनिर्मितीचे प्रायोगिक प्रशिक्षण देण्यासाठी विशेष शैक्षणिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना आयुर्वेदातील औषधी वनस्पतींचा उपयोग करून नैसर्गिक उत्पादने तयार करण्याचे प्रत्यक्ष कौशल्य विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यशाळे दरम्यान विविध औषधी वनस्पतींची ओळख, त्यांचे गुणधर्म, तसेच तेलनिर्मितीमध्ये त्यांचा प्रभावी वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रायोगिक सत्रात केसांसाठी उपयुक्त तेलनिर्मिती, त्वचेसाठी आवश्यक घटकांचे संतुलित मिश्रण, त्यांची योग्य पद्धतीने तयार करण्याची प्रक्रिया आणि सुरक्षित साठवण यावर विशेष भर देण्यात आला.Datta Meghe Ayurveda College यावेळी लाईफ वेद आयुर्वेदच्या संचालिका डॉ. पूनम मदान तसेच विश्वकुंभ आयुर्वेदचे संचालक डॉ. संतोष पुसदकर यांनी पारंपरिक औषधनिर्मिती पद्धती, मागील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आयुर्वेदिक औषधांचे आरोग्यदायी फायदे यावर सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत प्रत्यक्ष अनुभवातून आयुर्वेदातील ज्ञान अधिक समृद्ध केले.
सौजन्य:निकिता लुटे,संपर्क मित्र