नागपूर,
Humanity Youth Forum मानवता युवा मंच या संघटनेचा स्थापना दिवस १४ फेब्रुवारी रोजी काटोल रोड, टाकळी चौक येथील बालसदन सुसंस्कार केंद्रात अनाथ मुलांसोबत उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. बालसदनमधील मुलांनी भजन व सामुदायिक प्रार्थना सादर केली.
उद्घाटक ज्ञानेश्वर रक्षक यांनी मार्गदर्शन करताना “निष्काम सेवेसाठी सत्तेची गरज नसते. समाजातील गरजूंची सेवा हीच खरी राष्ट्रसेवा आहे,” असे प्रतिपादन केले. Humanity Youth Forum तरुणांनी जात, धर्म, पंथ यांच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा धर्म जपावा, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी मंचतर्फे मुलांना क्रिकेट किट, फुटबॉल, लगोरी सेट आदी खेळ साहित्य तसेच फळांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला डॉ. आनंदपाल अंबरते, देविदास लाखे, अमित शिंदे व मंचाचे सदस्य उपस्थित होते.
सौजन्य:ज्ञानेश्वर रक्षक,संपर्क मित्र