निनाद संगीत विद्यालयाची मासिक सभा

    दिनांक :18-Feb-2026
Total Views |
नागपूर,
Ninad Music School लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात निनाद संगीत विद्यालयाची मासिक सभा ‘गाता रहे मेरा दिल’ या शीर्षकाखाली संपन्न झाली. प्रारंभी सरस्वती वंदना सादर करण्यात आली आणि नंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले गेले. अध्यक्ष ऍड. धनश्री देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमात सहप्रायोजक बायो सिसचे विक्रांत यांची विशेष उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना संगीताच्या विविध परीक्षांमध्ये प्राविण्य मिळाल्याबद्दल बक्षिसे देण्यात आली.
 
Ninad Music School
 
कार्यक्रमात निनाद साने यांनी ‘बडी मुश्किल है’ हे गीत सादर केले. त्यानंतर ‘सवार लू’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘सुन बेलीया’, ‘गाता रहे मेरा दिल’, ‘जाने क्या बात है’, ‘चप्पा गप्पा चरखा चले’ अशा विविध चित्रपट गीतांच्या मालिकेने रसिकांची श्रवणेंद्रिये तृप्त केली. कलाकारांमध्ये मनीषा चौधरी, अपूर्वा नाईक, रेखा साने, प्रशांत चौधरी, स्वप्नील साने, मेघना गोंधळेकर, स्वाती जोशी, पारुल लाभे, मोनाली दारव्हेकर, अपर्णा चकोले यांचा समावेश होता. Ninad Music School वाद्यांवर परीमल जोशी, ॠग्वेद पांडे, अक्षय हरले, पंकज यादव, स्मिता देशपांडे यांनी साथसंगत केली. निवेदन रंजना चौधरी आणि करूणा गोंडाणे यांनी केले. संचालिका रेखा साने यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.
सौजन्य: अंजली पांडे, संपर्क मित्र