अनिल कांबळे
नागपूर,
10th SSC student death दहावीचा पेपर साेडवून आईसाेबत दुचाकीवर घरी परतणाèया विद्यार्थ्याच्या जीवनात एक भरधाव ट्रक काळ बनून आला. त्या ट्रकने मायलेकाला चिरडले. यात मुलगा ठार झाला तर आई गंभीर जखमी झाली. हा अपघात मंगळवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास यशाेधरानगर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील पिवळी नदी पार्किंग प्लाझासमाेर घडला. अथर्व चंद्रशेखर मेश्राम (16, रा.चंद्रमणीनगर, अजनी) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे तर आई रिना मेश्राम (40) या गंभीर जखमीचे नाव आहे.
पाेलिसांनी 10th SSC student death दिलेल्या माहितीनुसार, रिना मेश्राम या मंगळवारी सकाळी मुलगा अथर्व याला घेऊन दिल्ली पब्लिक स्कूल, कामठी राेड येथील परीक्षा केंद्रावर गेल्या हाेत्या. अथर्वचा पेपर संपल्यानंतर दाेघेही मायलेक दुचकीने घरी परतत हाेते. ते पिवळी नदी पार्किंग प्लाझासमाेर पाेहाेचले असता येथे एका भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली आणि चालक ट्रकसह पसार झाला. अपघातात दुचाकीवरून रिना आणि अथर्व राेडवर फेेकल्या गेले. अथर्व याला गंभीर दुखापत झाली, तर रिना मेश्राम या गंभीर जखमी झाल्या. परिसरातील नागरिकांनी दाेघांनाही तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डाॅक्टरांनी अथर्वला मृत घाेषित केले. या प्रकरणी चंद्रशेखर मेश्राम यांच्या तक्रारीवरून यशाेधरानगर पाेलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सीसीटीव्ही फुटेजवरुन शाेध
रिना आणि अथर्वला धडक 10th SSC student death देणाऱ्या ट्रकचालकाने अपघातानंतर वाहनासह घटनास्थळावरुन पळ काढला. त्यामुळे नागरिक संतप्त झाले. अपघातानंतर तणाव निर्माण झाला. यशाेधरानगर पाेलिसांनी लगेच सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. फुटेजच्या मदतीने फरार ट्रक चालकाचा शाेध सुरु केला आहे.