पुणे,
Pune traffic छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर उद्या, १९ फेब्रुवारी रोजी पुण्यात मोठ्या प्रमाणावर मिरवणूक आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे शहरातील मध्यवर्ती भागात गर्दीची शक्यता वाढली असून, वाहतूक पोलिसांनी नागरिकांच्या सुगम प्रवासासाठी विशेष नियोजन केले आहे.
मुख्य रस्त्यांवर तात्पुरते निर्बंध लावण्यात आले आहेत. लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्ता यावर वाहतुकीला बदल करण्यात आले असून या परिसरातील जड वाहनांना पूर्ण मनाई करण्यात आली आहे. पुणे ट्रॅफिक विभागाचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी नागरिकांना शक्यतो खाजगी वाहनांचा वापर टाळावा, असा आग्रह केला आहे. हा बदल सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळपर्यंत, गर्दी न ओसरत राहिली तर संपूर्ण दिवस लागू राहणार आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी Pune traffic पोलिसांनी विविध पर्यायी मार्गांची योजना आखली आहे. शिवाजी महाराज रस्त्यावरून जिजामाता चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना स. गो. बर्वे चौक मार्गे जंगली महाराज रस्ता, खंडोजीबाबा चौक आणि टिळक रस्ता वापरण्याचे सुचवले आहे. गणेश रस्त्यावरून दारूवाला पुलाकडे जाणारी वाहतूक दारूवाला पूल चौकातून फडके हौद चौकाकडे वळवण्यात येईल. बाजीराव रस्त्यावरून पूरम चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना टिळक रस्ता, अलका टॉकीज चौक आणि फर्ग्युसन रस्ता वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केळकर रस्त्यावरून अप्पा बळवंत चौकाकडे जाणारी वाहतूक मिरवणूक संपेपर्यंत बंद राहील, तर लक्ष्मी रस्त्यावर सोन्या मारुती चौकात मिरवणूक सुरू असताना वाहतूक संत कबीर चौकातून वळवण्यात येईल.वाहतूक पोलिसांनी रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि इतर तातडीच्या सेवांच्या वाहनांना प्राधान्याने मार्ग उपलब्ध करून देण्यात येईल, असेही सांगितले आहे. प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे तसेच नियोजनपूर्वक प्रवास करण्याचे आवाहन Pune traffic केले आहे.यंदाच्या जयंतीच्या उत्सवामुळे शहरातील प्रमुख रस्ते गर्दीग्रस्त होणार आहेत, त्यामुळे पुणेकरांनी पर्यायी मार्गांचा वापर करून प्रवासाची योजना आधीच तयार ठेवावी, असे ट्रॅफिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना सूचना दिली आहे.