शालेय अभ्यासक्रमात संत सेवालाल महाराजांच्या नैतीक विचारांना स्थान देण्यात यावे

    दिनांक :18-Feb-2026
Total Views |
मानोरा,
Sant Sewalal Maharaj, शालेय अभ्यासक्रमात संत सेवालाल महाराज यांची शिकवणूक व नैतीक विचारांना स्थान देण्यात यावे, अशी मागणी गोरबंजारा लोकक्रांती सेनेच्या वाशीम जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री यांच्याकडे निवासी नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, मानोरा यांच्या मार्फत शासनाकडे पाठविण्यात आले.
 


TJ 
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गोरबंजारा समाज हा ऐतिहासिकदृष्ट्या वंचित, भटके-विमुक्त घटकांपैकी एक असून, त्यांच्या इतिहास, संस्कृती व सामाजिक योगदानाची योग्य दखल शासनाने घ्यावी. संत सेवालाल महाराज यांनी समता, बंधुता, शिक्षण आणि नैतिक मूल्यांचा संदेश देत समाजजागृतीचे कार्य केले, त्यांच्या विचारांचा अभ्यासक्रमात समावेश झाल्यास विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधारित शिक्षणाची जाणीव निर्माण होईल आणि सामाजिक समरसता बळकट होणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. संघटनेने संविधानातील कलम १४ (समानतेचा अधिकार), कलम १५(४) (वंचित घटकांसाठी विशेष तरतूद) आणि कलम २१ ए (मोफत व सक्तीचे शिक्षण) यांचा दाखला देत ही मागणी योग्य व न्ययोचित असल्याचे स्पष्ट केले आहे. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला. यावेळी वाशीम जिल्हाध्यक्ष पंकज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळासह समवेत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.