वर्धा,
shiv-jayanti-celebrations छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात १६२ ठिकाणी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शिव जयंतीनिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांसह शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र उलगडवणारे पोवाडा तर मिरवणुकीचे आयोजनही करण्यात आले आहे.

जिल्ह्यात वर्धा, सेलू, पुलगाव, देवळी, खरांगणा, आर्वी, तळेगाव श्यामजी पंत, हिंगणघाट, वडनेर, गिरड आदी १३ ठिकाणी शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. शिवजयंतीचे औचित्य साधून ९९ ठिकाणी माल्यार्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. shiv-jayanti-celebrations जिल्ह्यात १६२ ठिकाणी महाराजांची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यात वर्धा ४, सावंगी २, सेवाग्राम ७, सेलू २, सिंदी ३, दहेगाव ४, पुलगाव १७, देवळी १६, अल्लीपूर १४, खरांगणा ११, आर्वी १३, कारंजा घा. ७, आष्टी शहीद ६, तळेगाव श्या.पं. ५, हिंगणघाट १३, वडनेर १८, गिरड १० आणि समुद्रपूर येथे १० ठिकाणी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. जयंती उत्सव शांततेत पार पाडण्याकरिता पोलिस विभागातर्फे बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी ५, पोलिस निरीक्षक १३, सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक ७५, पोलिस शिपाई ८५० यासोबत ८३२ गृहरक्षकांचा समावेश आहे.