आर्वीत पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस; १२ जणांना घेतला चावा

अर्धा डझन बालकांचा समावेश

    दिनांक :18-Feb-2026
Total Views |
वर्धा,
The horror of crushed dogs आर्वीत पिसाळलेल्या कुत्र्यांनी स्टेशन वार्ड व इतर ठिकाणी धुमाकूळ घालून १२ जणांचे लचके तोडले. यात सहा बालकांचा समावेश आहे. यातील एका बालकाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, येथील मटन मार्केट जवळ कुत्र्यांचे झुंडच्या झुंड असतात. दुपारनंतर गावात फिरतात. त्यापैकी एका पिसाळलेल्या कुत्र्याने चावा लहान मोठ्यांना चावा घेण्याचा सपाटा लावला.
 
 
vardha
 
यात धवल गजानन गुल्हाणे (८) या बालकाचा मृत्यू झाल्याने ही बाब चव्हाट्यावर आली. या घटनेची दखल घेत नगरपालिका प्रशासनाने श्वानांच्या निर्बीजीकरणाला सुरुवात केली. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपालिका प्रशासन जागे झाले आहे. The horror of crushed dogs  आ.र सुमित वानखेडे यांनी मुख्याधिकार्‍यांना निर्देश देताच मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाड, नगराध्यक्ष स्वाती गुल्हाने, उपाध्यक्ष गौरव जाजू, संजय राऊत, शहराध्यक्ष राहुल गोडबोले, आरोग्य सभापती संजय थोरात, आरोग्य निरीक्षक सुनील आरीकर, प्राणिमित्र शुभम जगताप आदींनी पुढाकार घेतला.