आद्यक्रांतिगुरू लहूजी साळवे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

    दिनांक :18-Feb-2026
Total Views |
नागपूर,
Lahuji Salve भारताचे आद्यक्रांतिगुरू लहूजी साळवे यांचे १४५वे स्मृतिदिन लहूजी साळवे स्मारक ट्रस्टच्या वतीने लहूजी साळवे उद्यान, अंबाझरी येथे साजरे करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष विनायक इंगोले यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
 
Lahuji Salve
 
कार्यक्रमात युवानेते सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जनजागृती विकास मंचचे मुख्य संयोजक कैलास पोटफोडे, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत वानखेडे, ज्येष्ठ नेते रविंद्र वानखेडे, ज्येष्ठ विचारवंत अरविंद डोंगरे, तसेच जनहित युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवशंकर ताकतोडे आणि नगरसेवक योगेश पाचपोर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. Lahuji Salve याशिवाय सचिन इंगोले, सागर जाधव, विजय डोंगरे, मोतीराम उबाळे, वैभव इंगोले, भारत शिंदे, कांताराम वानखेडे, जिजा वाघमारे, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
सौजन्य: शिवशंकर ताकतोडे, संपर्क मित्र