३७ राज्यसभा जागांसाठी १६ मार्चला मतदान!

    दिनांक :18-Feb-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Voting for 37 Rajya Sabha seats भारतीय निवडणूक आयोग यांनी देशातील दहा राज्यांमधील रिक्त झालेल्या राज्यसभेच्या ३७ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. आयोगाच्या घोषणेनुसार मतदान प्रक्रिया १६ मार्च रोजी पार पडणार आहे. संबंधित जागांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात वेगवेगळ्या तारखांना संपत असल्याने ही निवडणूक घेतली जात आहे. ज्या राज्यांमध्ये ही निवडणूक होणार आहे त्यात महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा, तामिळनाडू, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, आसाम, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि बिहार यांचा समावेश आहे. या सर्व राज्यांतील सदस्यांचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येणार असल्याने नव्या सदस्यांची निवड केली जाणार आहे.
 
 
Rajya Sabha seats
राज्यसभेचा प्रत्येक सदस्य सहा वर्षांसाठी निवडला जातो; मात्र दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने त्या जागांसाठी निवडणूक घेण्यात येते. त्यामुळेच राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह मानले जाते. लोकसभेप्रमाणे तिचे कधीही विसर्जन होत नाही, ही तिची वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. आगामी निवडणुकांमुळे विविध राज्यांतील राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.