कर वसूलीसाठी गेलेल्या पाणी पुरवठा अभियंता व शिपायास मारहाण

कारवाईची संघटनेची मागणी

    दिनांक :18-Feb-2026
Total Views |
रिसोड,
water supply engineer assault, नगर परिषद रिसोड येथील नंदकिशोर पुंडलिक डाखोरे (पाणी पुरवठा अभियंता) व अमजद खान दारेफ खान पठाण (पाणी पुरवठा शिपाई) यांना पाणी पुरवठा वसुली दरम्यान केलेल्या मारहाण केल्या प्रकरणी मारहाणकर्त्या विरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या वतीने १७ फेब्रुवारी रोजी नगरपरिषद मुख्याधिकारी सतिष शेवदा यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
 

water supply engineer assault, 
निवेदनात नमुद करण्यात water supply engineer assault आले आहे की, वरिष्ठ कार्यालयाचे निर्देश आणि मुख्याधिकारी यांचे आदेशान्वये शहरातील सर्व मालमत्तावरील मालमत्ता कर आणि पाणी पट्टी वसुली करीता वसुली पथक नेमण्यात येते. सदर पथकास संपूर्ण मालमत्ता कर आणि पाणी पट्टी वसुलीचे लक्ष निर्धारित करून देण्यात येत असते. सदर आदेशाच्या अनुषंगाने वसुली पथक प्रमुख व इतर कर्मचारी यांचेमार्फत दैनंदिनरित्या थकबाकीदार यांचे घरी भेट देऊन थकबाकी रक्कम वसूल करण्याबाबत पूर्ण प्रयत्न करण्यात येतात. सन २०२५-२०२६ या कालावधी करिता १७ फेब्रुवारी २०२६ रोजी कार्यालयीन वेळेत नंदकिशोर डाखोरे (पाणी पुरवठा अभियंता) व अमजद खान दारेफ खान पठाण (पाणी पुरवठा शिपाई) हे अहेबाब नगर या ठिकाणी थकीत व चालू पाणी पुरवठा वसुली करीता गेले असता सदानंद गायकवाड यांनी अर्वाच्य भाषा वापरून उपरोक्त कर्मचार्‍यांना मारहाण करून अ‍ॅट्रासिटी कायद्याअंतर्गत व त्यांच्या पत्नीच्या नावाने विनयभंग करणेबाबतचा गुन्हा दाखल करणेबाबतची धमकी दिली.
या घडलेल्या अनुचित प्रकारामुळे सर्व कर्मचार्‍यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, वसुली करतांना होणारी मारहाणी आणि खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमयामुळे कर्मचार्‍यांचे मनोबल खच्चीकरण होऊन जीवितास धोका निर्माण होण्याची शयता निर्माण झाली आहे. करिता सदानंद गायकवाड यांनी केलेल्या मारहाणी प्रकरणी त्यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देतांना महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.