अनिल कांबळे
नागपूर,
kidnapped and sexually assaulted वस्तीत राहणाऱ्या 17 वर्षीय युवकाचे पत्नीशी अनैतिक संबंध असल्याची कुणकुण पतीला लागली. त्यामुळे त्याने त्या मुलावर पाळत ठेवली. पत्नीशी संबंध असल्याची त्याला खात्री पटली. बदल घेण्यासाठी त्या युवकाचे दाेन मित्रांसह कारने अपहरण केले. त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी इमामवाडा पाेलिसांनी आराेपी पतीला अटक केली असून त्याला न्यायालयाने तीन दिवस पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
कुख्यात आराेपी हा इमामवाड्यातील एका वस्तीत राहताे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. आराेपीच्या पत्नीशी एका 17 वर्षीय युवकाचे प्रेमसंबंध हाेते. ही बाब आराेपीला माहिती पडली. त्याने पाळत ठेवून खातरजमा केली. त्याची खात्री पटल्यानंतर त्या युवकाला धडा शिकविण्याचे त्याने ठरविले. त्यासाठी ताे त्या मुलाच्या नेहमी पाळतीवर हाेता. 15 ेब्रुवारीला सकाळी ताे युवक आणि त्याचे दाेन मित्र मेडिकल चाैकात बसले हाेते. दरम्यान, ताे आराेपी तेथे कार घेऊन आला. त्याने चाैघांनाही अंभाेरा तलाव बघायला जाण्याचे आमिष दाखवले. ते चाैघेही कारमध्ये बसले. अंभाेरा परीसरात कार न थांबवता जंगलात थांबवली. त्यामुळे चारही तरुण घाबरले. आराेपीने कारमधून चाकू काढला आणि एका युवकावर हल्ला केला. ‘माझ्या बायकाेशी प्रेमसंबंध ठेवल्यामुळे तुझा खून करणार आहे.’ अशी धमकी दिली. त्या मुलाने हातपाय जाेडून माी मागितली. मात्र, संतप्त झालेल्या आराेपीने त्या युवकाला कपडे kidnapped and sexually assaulted काढण्यास सांगितले. त्यानंतर त्याच्याच मित्राला त्या युवकावर लैंगिक अत्याचार करण्यास भाग पाडले. त्या कुकृत्याचा त्याने माेबाईलने व्हिडिओ काढला.
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
आराेपीने चाैघांनाही कारमध्ये बसवून नागपुरात kidnapped and sexually assaulted आणले. घडलेला प्रकार सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. मात्र, त्या युवकाने आपल्या वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. त्याने इमामवाडा पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. पाेलिसांनी गुन्हा दाखल करुन आराेपीला अटक केली. त्याचा माेबाईल जप्त करण्यात आला.