बाळ विक्री प्रकरण:मुख्य आरोपी डॉ. नितेश बाजपेयी याला अखेर अटक
दिनांक :19-Feb-2026
Total Views |
भंडारा ,
baby selling case बाळ विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. नितेश बाजपेयी याला आज भंडारा पोलिसांनी अटक संध्याकाळी उशिरा अटक केली. त्यामुळे या प्रकरणात आता अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. डॉक्टरांच्या अटकेमुळे आता या प्रकरणातील अटक झालेल्या आरोपींची संख्या तीन वर पोहोचली आहे.
उपचाराच्या नावाखाली एका चिमूकलीला नागपूरला पाठवीत असल्याचे सांगून मध्यस्थ्यांच्या मदतीने तिची तीन लाखात विक्री करण्याचे प्रकरण 3 फेब्रुवारी रोजी उघडकीस आले होते. या प्रकरणी गोंदिया न्यू बालाजी क्लिनिकचे संचालक डॉ. नितेश बाजपेयी यांच्यासह सहा जणांवर गुन्हे दाखल झाले होते. यातील दोन आरोपी यापूर्वी पकडल्या गेले. मुख्य आरोपी बाजपेयी यांचा पोलिसांकडून शोध सुरू होता. काही दिवसांपूर्वी बाजपेयी यांनी आत्महत्येचा प्रयत्न करीत स्वतःला जखमी करून घेतले होते. भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान 17 फेब्रुवारी रोजी आरोपी डॉ. बाजपेयी याचा अटकपूर्व जामीन अर्ज भंडारा जिल्हा न्यायालयाने फेटाळल्याने कुठल्याही क्षणी त्यांना अटक होईल अशी शक्यता होती. उपचार करीत असलेल्या डॉक्टरांकडून ते फीट असल्याचे स्पष्ट होताच आज 19 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी उशीरा आरोपी नितेश बाजपेयी याला अटक केली.baby selling case सध्या डॉ. बाजपेयी भंडारा पोलिसांच्या ताब्यात असून उद्या न्यायालयात सादर केले जाणार असल्याचे समजते. मुख्य आरोपीच्या अटकेमुळे आता या प्रकरणातील अनेक गोष्टींचा खुलासा लवकरच होईल अशी शक्यता आहे. जदरम्यान या प्रकरणाची चौकशी सुरू असताना उघडकीस आलेले डिसेंबर महिन्यातील बाळ विक्री प्रकरणही आता उलगडून त्यावेळी विकले गेलेले बाळही हाती लागण्याची शक्यता असल्याने नक्कीच हे भंडारा पोलिसांसाठी मोठी उपलब्ध असणार आहे.