नागपूर,
book exhibition महाविद्यालयाच्या केंद्रीय ग्रंथालयात पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये व कर्मचारी वर्गामध्ये वाचनाची आवड निर्माण करणे तसेच अभ्यासक्रमाबाहेरील विविध विषयांवरील पुस्तकांची ओळख करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. उदय वाघे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभियांत्रिकी, व्यवस्थापन, गणित, विज्ञान, चरित्रे, आत्मचरित्रे तसेच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तकांचे प्रदर्शन करण्यात आले. ग्रंथालयातील साधनसामग्रीची माहिती देत वाचनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यात आली. नामवंत लेखक, शास्त्रज्ञ व महान व्यक्तींची चरित्रे वाचण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले. book exhibitionकार्यक्रमास रजिस्ट्रार डॉ. सुनील प्रयागी, मुख्य प्रशासकीय अधिकारी . चेतन वझलवार, अधिष्ठाता (शैक्षणिक) डॉ. संजय राऊत, अधिष्ठाता (नियोजन व विकास) डॉ. अरविंद पाटील, सी.ए. राविन सिंग तसेच विभागप्रमुख डॉ. स्नेहल गावंडे, डॉ. ललित दमाहे, डॉ. कविता सिंग, डॉ. स्वाती रहाटे आदी उपस्थित होते.मुख्य समन्वयक डॉ. राजेंद्र पहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. देवऱाव काळे, आरती ठाकरे, संजय जाधव प्रणाली रहाटे व ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सौजन्य: राजेंद्र पहाडे,संपर्क मित्र