तळेगाव (श्या.पंत.),
talegaon polices स्थानिक पोलिसांनी दोन तलवार व एक खंजर बाळगणार्यास अटक केली. ही कारवाई १९ रोजी करण्यात आली. किस्मतसिंग उर्फ कालुसिंग किसनसिंग बावरी (४८) रा. काकडधरा, तळेगाव (श्या.पंत.) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर ढोले, सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश भोयर यांच्या मार्गदर्शनात तळेगाव पोलिसांनी चिस्तुर गावाजवळ कारवाई केली.talegaon polices या कारवाईत पोलिसांनी किस्मतसिंग उर्फ कालुसिंग किसनसिंग बावरी याला अटक केली. त्याच्याजवळून दोन तलवार व एक खंजर असे तीन धारदार हत्यार जप्त करून गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक किशोर खंडार, अश्विन ढाले, सूरज खडसे, रणजित बागडे, दत्ता बाभळे, किशोर कापडे यांनी केली.