प्रकल्पग्रस्तांच्या नोकरी व मोबदल्याचा मार्ग मोकळा
दिनांक :19-Feb-2026
Total Views |
हंसराज अहिर यांच्या प्रयत्नांना यश
चंद्रपूर,
section 9 by vecoli अधिग्रहित जमिनीचा वाद न्यायालयात प्रलंबित असल्याचे कारण सांगून, प्रकल्पग्रस्त शेतकर्यांची नोकरी व आर्थिक मोबदला वेकोलि व्यवस्थापनाकडून थांबविण्यात येत होता. याबाबत माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे केंद्रीय कोळसामंत्री जी. किशन रेड्डी यांनी, नागपूर येथील वेकोलि मुख्यालयाकडून नियमात बदल करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानुसार नियमात बदल करण्यात आले असून, आता वेकोलि प्रकल्पग्रस्तांच्या नोकरी व मोबदल्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
कोळसा मंत्रालयाने दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करीत वेकोलि मुख्यालयाकडून 22 जानेवारी 2026 रोजी झालेल्या बोर्ड बैठकीमध्ये याबाबतच्या प्रमाणभूत कार्यपध्दतीमध्ये बदल करीत, कोणत्याही प्रकल्पात अधिग्रहण कायद्याच्या सेक्शन 9 अधिसूचना प्रकाशनानंतर दाखल झालेल्या न्यायालयीन वादात प्रकल्पग्रस्त शेतकर्यांची नोकरी व आर्थिक मोबदला थांबविण्यात येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.section 9 by vecoli या निर्णयानुसार प्रकल्पग्रस्त शेतकर्यांकडून हमीपत्र दाखल करवून घेत नोकरी व मोबदला प्रदान करण्याची कारवाई लवकरच करण्यात येत असल्याचे वेकोलि व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.