शिवतीर्थावर ढोल-ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांना जलाभिषेक

जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणाने संपूर्ण आसमंत दुमदुमून

    दिनांक :19-Feb-2026
Total Views |
भाजप आणि युवा मोर्चातर्फे शिवजयंती उत्साहात
 नागपूर,
shiv tirtha हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महालच्या शिवतीर्थावर ढोल-ताशांच्या गजरात महाराजांना जलाभिषेक करण्यात आला आणि त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात भारतीय जनता पार्टी नागपूर महानगर तर्फे महाल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, महापौर नीता ठाकरे,उपमहापौर लीला हाथीबेड, सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर, आमदार प्रवीण दटके आदींच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याशिवाय भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शहरातील १५१ वॉर्डांमध्ये शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले तसेच शहरातील १५०० हून अधिक बूथवर शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. भाजपच्या विविध आघाड्यांतील कार्यकर्त्यांनीही आपआपल्या प्रभागात शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती कार्यक्रमात शिवतीर्थावर राजे मुधोजी भोसले यांनी पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले.
 
 
शिवजयंती उत्साहात
 
 
पहाटेपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन
जय भवानी, जय शिवराय’च्या गर्जनेने भागातील ’शिवतीर्थ’ छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात पहाटेपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे शिवतीर्थावर शिवभक्तांची मांदियाळी होती.
हजारो शिवप्रेमी पहाटेपासूनच दाखल झाले होते. शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला होता.
प्रत्येक मार्गावर भगव्या पताका, झेंडे
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा सोहळा निमित्त गुरुवारी विविध संस्थांतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. दक्षिण नागपूरातील प्रत्येक मार्गावर भगव्या पताका आणि झेंडे लावण्यात आले होते. सक्करदरा चौक, महाकालीनगर चौक, महाल,एच.बी. इस्टेट व परिसरात महाराजांची विविध देखाव्यासह पालखी मिरवणुक काढण्यात आली.
शिवकल्याण राजा’या भक्तिमय कार्यक्रम
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला दक्षिण नागपूरच्या ताजबाग, सक्करदरा येथे सुप्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांच्या ’शिवकल्याण राजा’या भक्तिमय कार्यक्रम झाला. या दिमाखदार कार्यक्रमास महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हातीबेड, भाजपा शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, राजे मुधोजी भोसले तसेच दक्षिणचे आ.मोहन मते यांच्यासह मोठ्या संख्येने नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास आणि भक्तीचा हा अभूतपूर्व संगम नागपूरच्या जनतेसाठी एक अविस्मरणीय सोहळा ठरला. भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण नागपूर व आमदार मोहन मते मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले होते.
ढोल-ताशांच्या गजरात शिवरायांचा जयघोष
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त केवळ महालच नव्हे तर संपूर्ण नागपूर शहरात उत्साहाचे आणि वातावरण निर्माण झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात शिवरायांचा जयघोष करण्यात आला. यात प्रामुख्याने शहराचे ऐतिहासिक केंद्र असलेल्या महाल भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा विविध फुलांनी सजविला होता. परिसरात अतिशय आकर्षक रोषणाई करण्यात आली असून विद्युत रोषणाईने हा परिसर उजळून निघाला आहे.
अभिषेक व पुजन,माल्यार्पण करुण अभिवादन
जय शिवाजी, जय गजराने झिंगाबाई टाकळी परिसरातील श्रीकृष्ण सभागृह येथे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अभिषेक व पुजन,माल्यार्पण करुण अभिवादन करण्यात आले. ढोल ताशाची सलामी देण्यात आली. शिवभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मोठया संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
 
संग्राम सेनानी भैय्याजी भुते स्मृती सेवा संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी गेट, महाल येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण व मानवंदना देण्यात आली.shiv tirtha सक्करदरा चौकातून निघाली बाईक रॅली मराठा विद्या प्रसारक समाज व नागरिक कृती समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मृती सभागृह, सक्करदरा चौक येथून सकाळी बाईक काढण्यात आली. जय भवानी जय शिवाजी’च्या गजरात भगवा पताकासह महिला-पुरुष स्कूटर रॅलीत सहभागी झाले होते. सायंकाळी ताजराज हिरा आखाडा तर्फे शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
....