नागपूर,
Clean Plate Challenge गजानन नगर मैदान येथे आयोजित हिंदू महासभेत जेसीआय ऑरेंज सिटीच्या सदस्यांच्या सक्रिय सहभागातून “क्लीन प्लेट चॅलेंज” हा अर्थपूर्ण आणि जागरूकता निर्माण करणारा उपक्रम राबविण्यात आला. प्रत्येक ताटातील प्रत्येक कणाचा सन्मान करावा आणि अन्न वाया जाऊ नये, हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.
महासभेला सुमारे १,००० पेक्षा अधिक भक्तांनी उपस्थिती लावून महाप्रसादाचा लाभ घेतला. स्वयंसेवकांनी उपस्थितांशी संवाद साधत योग्य मार्गदर्शन केले. सजगतेची जाणीव करून देत अन्न वाया जाण्यात अंदाजे १० टक्के घट साध्य करण्यात यश मिळाले. जबाबदार भोजन पद्धतीचा सकारात्मक परिणाम या उपक्रमातून स्पष्ट झाला. Clean Plate Challengeया उपक्रमा दरम्यान लहान मुलांशी विशेष संवाद साधण्यात आला. अन्नाचे महत्त्व पटवून देत काही मुलांना भविष्यात अन्न वाया न घालवण्याची शपथ देण्यास प्रेरित करण्यात आले. त्यामुळे हा उपक्रम केवळ तात्पुरता परिणामकारक न ठरता भावी पिढीत जबाबदार सवयी रुजवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरला.“क्लीन प्लेट चॅलेंज”च्या माध्यमातून अन्नाचा सन्मान हा कृतज्ञता, शिस्त आणि सामाजिकजबाबदारीचे प्रतीक असल्याचा ठाम संदेश देण्यात आला. छोट्या-छोट्या सजग कृतींमधून मोठा सकारात्मक बदल घडू शकतो, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले.
सौजन्य : सुहास खरे, संपर्क मित्र