मोबाईल-व्यसनापेक्षा मैदानाशी नाते जोडा : महेंद्र ब्राम्हणवाडे

    दिनांक :19-Feb-2026
Total Views |
गडचिरोली, 
mahendra brahmanwade कबड्डी व व्हॉलीबॉलसारखे खेळ शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक एकाग्रता आणि संघभावना विकसित करतात. ग्रामीण भागातील युवकांनी मोबाईल व अन्य व्यसनांपासून दूर राहून खेळाकडे वळावे. नियमित सराव, शिस्त आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर यश संपादन करावे, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले.
 

महेंद्र ब्राम्हणवाडे  
 
 
सार्वजनिक नवयुवक क्रीडामंडळ, जीवनगट्टा यांच्या सौजन्याने आयोजित भव्य ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. तसेच स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंनी विजय-पराजय समभावाने स्वीकारून क्रीडाभावनेने खेळावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी व्हालीबाल सामन्याचाही आनंद घेत खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले.mahendra brahmanwade या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य तथा आदिवासी विकास महामंडळ, नाशिकचे संचालक सैनुजी गोटा, तालुका अध्यक्ष वसंत राऊत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रज्वल नागूलवार, एटापल्लीचे नगरसेवक मनोहर बोरकर, किसान हिचामी, निजाम पेंदाम, महिला तालुकाध्यक्ष ताराताई गावडे, नगरसेविका सरिता गावडे, उषा ठाकरे, पुंघाटे, माजी सरपंच दिवाकर निसार, लोकनाथ गावडे, दुर्गे, धिवरू मेश्राम, श्रीनिवास ताडपल्लीवार, विपुल येलेट्टीवार, संपत करमरकर, रेणुजी हिचामी, संभाजी हिचामी, देवाजी अरमा यासह ग्रामस्थ, क्रीडाप्रेमी तसेच युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.