१ एप्रिलपासून क्रेडिट कार्ड नियमांत होणार ५ महत्त्वाचे बदल; जाणून घ्या संपूर्ण माहिती
दिनांक :19-Feb-2026
Total Views |
नवी दिल्ली,
credit-card-rules-from-april-1 १ एप्रिल २०२६ पासून क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी काही महत्त्वाचे नियम बदलू शकतात. आयकर विभागाने जारी केलेल्या २०२६ च्या आयकर मसुद्यात क्रेडिट कार्डसंबंधी पाच मोठे बदल प्रस्तावित केले आहेत, जे अंतिम मंजुरीनंतर १९६२ च्या जुन्या तरतुदींची जागा घेऊ शकतात. या बदलांचा तुमच्या आर्थिक आणि कर नियोजनावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.
या बदलांमुळे मोठ्या क्रेडिट कार्ड व्यवहारांवर अधिक कडक तपासणी होईल आणि डिजिटल पेमेंटमध्ये पारदर्शकता वाढेल. credit-card-rules-from-april-1 मोठे खर्च करणारे किंवा कंपनी कार्ड वापरणारे लोक रेकॉर्डकीपिंग आणि कर नियोजनाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.