नागपूर ,
Emerging singer Nidhi Ranade रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आसूद गावातील सुमारे ८०० वर्षे प्राचीन, हेमाडपंथी शैलीतील जागृत शिवमंदिरात महाशिवरात्री उत्सव भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला.नागपूर, पुणे व रत्नागिरी येथील गजानन रानडे, उमाकांत रानडे, नरेंद्र रानडे, गणेश रानडे, दीपलक्ष्मी रानडे, स्नेहल रानडे, चित्रा जोशी, वैशंपायन, सोहम रानडे तसेच उदयोन्मुख गायिका निधी रानडे यांनी सहभाग घेतला.
सायंकाळी ७.३० वाजता व्याघ्रेश्वर परिवारातील सदस्यांनी भक्ती संगीताचा सुरेल कार्यक्रम सादर केला. भक्ती संगीतानंतर ‘वंदे मातरम’च्या १५० व्या वर्षानिमित्त अहिल्यानगरच्या स्वाती रानडे यांनी “वंदे मातरम” या विषयावर श्रवणीय प्रवचन केले. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या या राष्ट्रीय गीतातील प्रत्येक कडव्याचा आणि शब्दाचा अर्थ त्यांनी प्रभावीपणे उलगडून सांगितला.Emerging singer Nidhi Ranadeकार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्याघ्रेश्वर न्यासाचे कार्यवाह धनंजय रानडे (पुणे), अध्यक्ष शिरीष जोशी (बेळगाव), खजिनदार आनंद रानडे, मंदार रानडे (नवी मुंबई), जितेंद्र रानडे, सचिन रानडे (पुणे), श्रीनिवास रानडे (नाशिक), अनिल जोशी (गोवा), प्रदीप रानडे (कर्नाटक), देवेंद्र रानडे (नागपूर) तसेच व्याघ्रेश्वर कुलस्वामी परिवारातील सदस्यांनी मोलाचे योगदान दिले.महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा आदी राज्यांतून व्याघ्रेश्वर कुलस्वामी परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भव्य दिव्य महाशिवरात्री उत्सवाला भक्तीमय वातावरणात यशस्वी केले.
सौजन्य:उमाकांत रानडे ,संपर्क मित्र