वर्धा,
steroid tablets शहरातील श्वास हॉस्पिटलमधील श्वास फार्मसीतून ९ वर्षांच्या रुग्णाच्या नातेवाईकांना मुदतबाह्य स्टेरॉइडच्या ४ टॅबलेट विक्री करण्यात आल्या. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या औषध विभागाला तक्रार प्राप्त झाल्यावर अधिकार्यांनी श्वास फार्मसीच्या संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावला. नोटीसच्या अनुषंगाने लेखी म्हणणे प्राप्त झाल्यावर अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुत (औषधी) नीरज लोहकरे यांनी श्वास फार्मसीचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे.
श्वास फार्मसीतील फार्मसिस्टकडून शौर्य भेंडे या ९ वर्षाच्या रुग्णाला डॉटरांनी लिहून दिलेल्या चार वेगवेगळ्या औषधांची शौर्यच्या नातेवाईकांना विक्री करताना मुदतबाह्य झालेल्या स्टेरॉईडच्या चार गोळ्याही विकल्या. या चार गोळ्यांपैकी २ गोळ्या मे २०२५ तर २ गोळ्या जुलै २०२५ रोजी मुदतबाह्य झाल्या होत्या. पण, श्वास फार्मसीतून संबंधित औषध विक्रीनंतर देण्यात आलेल्या बिलात हे पूर्वीच मुदतबाह्य झालेले औषध ऑगस्ट २०२८ ला मुदतबाह्य होणार, असे दर्शविण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणी तक्रार करण्यात आली. मुदतबाह्य स्टेरॉइड विक्री प्रकरणात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने औषध विभागाच्या अधिकार्यांनी ४ फेब्रुवारीला श्वास फार्मसीची तपासणी केली. चौकशीत अनेक गंभीर बाबी पुढे आल्या. त्यानंतर श्वास फार्मसीच्या संचालकांना औषध विभागाच्या अधिकार्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावला. नोटीसच्या अनुषंगाने लेखी म्हणणे औषध विभागाला प्राप्त झाल्यावर औषध विभागाने श्वास फार्मसीचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे.
९० दिवसांचा अल्टीमेटम
मुदतबाह्य स्टेरॉइड टॅबलेट विक्रीनंतर बहुचर्चित ठरलेल्या श्वास फार्मसीचा परवाना कामयस्वरूपी औषध विभागाने रद्द केला. हा आदेश सहाय्यक आयुत (औषधी) नीरज लोहकरे यांनी निर्गमित केला आहे.steroid tablets या आदेशान्वये श्वास फार्मसीच्या संचालकांना संबंधित व्यावसायिक प्रतिष्ठानातील औषध साठ्याची पुढील ९० दिवसांत म्हणजेच मे २०२६ अखेरपर्यंत योग्य विल्हेवाट लावण्याचे आदेशही लोहकरे यांनी दिले आहेत.