अनिवासी भारतीय महिलेचे जबरदस्ती धर्मांतर!

    दिनांक :19-Feb-2026
Total Views |
सुरत,
Forced conversion of a NRI woman गुजरातमधील सुरत येथे एका अनिवासी भारतीय हिंदू महिलेची फसवणूक, जबरदस्ती धर्मांतर आणि आर्थिक शोषण केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लालगेट पोलिसांनी एजाज पटेल नावाच्या तरुणाला अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला परदेशात वास्तव्यास असून ती सुरतमधील एका नामांकित वस्त्रदालनातून नेहमी वस्त्रांची मागणी करत असे. त्या दालनात काम करणाऱ्या एजाजने तिच्याशी संपर्क साधला. वारंवार संदेश आणि दूरध्वनीद्वारे संवाद वाढवत त्याने तिच्याशी जवळीक निर्माण केली. हळूहळू हे संबंध प्रेमसंबंधात रूपांतरित झाले.
 

NRI woman surat 
त्यानंतर एजाजने तिला सौदी अरेबियाला नेल्याचा आरोप आहे. तेथे तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याचे महिलेच्या भावाने तक्रारीत नमूद केले आहे. पुढे आरोपीने तिच्याशी विवाह झाल्याचे भासवून तिच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. वैयक्तिक छायाचित्रे आणि माहिती सार्वजनिक करण्याची धमकी देत त्याने तिला धमकावले आणि मोठ्या प्रमाणावर पैसे व मालमत्ता हिसकावून घेतल्याचा आरोप आहे.
 
आरोपीने महिलेचे सुमारे १८ तोळे सोने, दागिने, हैदराबाद येथील अंदाजे ५० लाख रुपयांचा सदनिका तसेच मोठी रोख रक्कम स्वतःच्या नावावर करून घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकाराची माहिती महिलेने आपल्या भावाला पत्राद्वारे दिली. त्यानंतर तो सुरत येथे येऊन पोलिसांत तक्रार दाखल केली. चौकशीत एजाज हा विवाहित असून त्याला एक अपत्य असल्याचेही उघड झाले आहे. पोलिसांनी त्याचा भ्रमणध्वनी आणि संगणक जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.