७० वर्षीय वृद्धास उच्च न्यायालयाचा दिलासा

- एफआयआर व दोषारोप पत्र रद्द

    दिनांक :19-Feb-2026
Total Views |
गोंदिया, 
nutan bansod देवरी येथील ७० वर्षीय नूतन बनसोड यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेली एफआयआर व दोषारोपपत्र रद्द करून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे वयोवृद्ध बनसोड यांना दिलासा मिळाला आहे.
 

FIR  
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, देवरी येथील त्यांच्या एका नातेवाईक महिलेने तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरून देवरी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९ अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास पूर्ण केला आणि अतिरिक्त सत्र न्यायालय, गोंदिया येथे दोषारोपपत्र सादर केले होते. या कारवाईविरोधात नूतन बनसोड यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती उर्मिला फाळके-जोशी यांच्या खंडपीठासमोर झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट निरीक्षण नोंदवित एफआयआर व दोषारोपपत्रामध्ये कोणतेही ठोस, विश्वासार्ह व प्राथमिकदृष्ट्या ग्राह्य पुरावे आढळून येत नाहीत. त्यामुळे संबंधित एफआयआर व दोषारोपपत्र रद्द करण्याचे आदेश देण्यात आले.nutan bansod नूतन बनसोड यांच्या वतीने अ‍ॅड. अदिती पारधी व अ‍ॅड. योगेश पारधी यांनी युक्तिवाद सादर करत न्यायालयासमोर बाजू मांडली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे संबंधित प्रकरणात महत्त्वपूर्ण वळण आले असून, कायदेशीर प्रक्रियेत ठोस पुराव्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.