दिवाणी स्वरूपाच्या वादाला फौजदारी रंग देणे याेग्य नाही : उच्च न्यायालय

    दिनांक :19-Feb-2026
Total Views |
नागपूर,

अनिल कांबळे
civil dispute जर गुन्हा दिवाणी स्वरुपाचा असेल तर त्याला विनाकारण फौजदारी रंग देणे याेग्य नाही. यामुळे न्यायालयाचा वेळ वाया जाताे तसेच तपासाची दिशा भरकटण्याची शक्यता असते, असे निरीक्षण नाेंदवत उच्च न्यायालयाने फौजदारी गुन्हा रद्द केला. हा निर्णय न्यायमूर्ती उर्मिला जाेशी-फलके यांनी दिला.
दसराज प्रेमचंद पवनीकर असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. पवनीकर यांच्यासह इतर अर्जदारांनी हिंगणा पाेलिस ठाण्यात दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली हाेती. संबंधित गुन्ह्यात फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे आणि कट रचणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. या प्रकरणातील वाद हा नागपूर जिल्ह्यातील साेनडापार येथील खसरा क्रमांक 63 /1 या जमिनीच्या मालकी हक्काबाबतचा आहे.
 

उच्च न्यायालय  
 
अर्जदारांच्या आई मुक्ताबाई यांना या जमिनीत हिस्सा मिळाल्याचा दावा असून, त्यांच्या निधनानंतर अर्जदारांनी त्यांचा हिस्सा विक्री केल्याचे नमूद आहे. या विक्रीला विराेध करत तक्रारदाराने दावा केला की, मुक्ताबाई यांचा काेणताही हिस्सा नव्हता आणि अर्जदारांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन विकली. न्यायालयाने निरीक्षण नाेंदवले की, संबंधित मालकी हक्काचा वाद आधीपासून नागरी न्यायालयात प्रलंबित आहे.civil dispute तसेच एफआयआर किंवा साक्षीदारांच्या निवेदनात अर्जदारांनी स्वत: बनावट स्वाक्षèया केल्याचे ठाेस आराेप दिसून येत नाहीत. त्यामुळे प्रथमदर्शनी फौजदारी गुन्ह्याचे आवश्यक घटक सिद्ध हाेत नाहीत, असे न्यायालयाने म्हटले. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने नमूद केले की, नागरी स्वरूपाच्या वादाला ाैजदारी गुन्ह्याचा रंग देणे ही न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयाेग ठरू शकताे. परिणामी, संबंधित एफआयआर व त्यातून निर्माण झालेली पुढील ाैजदारी कार्यवाही रद्द करण्यात आली.